पुस्तके : बाल संग्रह    
   


टि्क टॉक ट्रिंग
 

 

अनु मनु शिरु

 

जंगल जंगल जंगलात काय ?

 

भिंगोऱ्या भिंग

  प्रकाशक : अनुजा प्रकाशन, पुणे
  आवृत्ती पहिली : १९९२
  कमत : ४ रुपये, पृष्ठे १६
प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद
मुखपृष्ठ व आतील चित्रे : विकास जोशी
आवृत्ती पहिली : १९९२
किंमत : आठ रुपये, पृष्ठे १६
प्रकाशक : सेतू प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ व आतील चित्रे : गणेश विसपुते, पुणे
आवृत्ती पहिली : २३ मे १९९३
किंमत : दहा रुपये, पृष्ठे १६
प्रकाशक : कजा कजा मरू प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ व आतील चित्रे : रसिका काळे, पुणे
आवृत्ती पहिली : २००८
किंमत : २५ रुपये, पृष्ठे २४
   
 
   
   
अनु मनु शिरु

झुकझुक गाडी

अनु मनु अरु शिरु
खूप मुलं जमली
गंमत म्हणून त्यांनी छान
झुकझुक गाडी केली

जादूच्या या गाडीला
मुळीच नव्हते रूळ
इंजिन होते भारी आणि
डब्यात नव्हती धूळ


 
  धाडधाड करीत गेली
माडीवरून खाली आली
जोरात शिट्टी करीत मग
खालून वरती गेली

वाटेत खूपदा डबे सुटले
इंजिन बदली झाले
इंजिन झाले डबा आणि
डबा इंजिन झाले

खूप झाली धावाधावी
गाडी दमून गेली
बॅटबॉल दिसला तशी
क्रिकेट खेळू लागली !
  भिंगोऱ्या भिंग

खेड्यामधली म्हैस

खेड्यामधली म्हैस चुकुन
शहरात आली एकदा
धावत सुटली भांबावून
सिग्नल तोडले तीनदा

दमून भागून चारा खात
वाट्टेल तिथे थांबली
नो पार्किंग पाटीसुद्धा
तिने नाही पाहिली !

पोलिसाची शिट्टी ऐकून
धावत सुटली पुन्हा
`नो एंट्री' बोळात शिरून
नवाच केला गुन्हा
  धापा टाकत पुन्हा नेमकी
आली भर चौकात
रंगीत मोठी चित्रे पाहून
गाऊ लागली जोरात

शहरामधली एक मैत्रीण
भेटली तिला तिथे
वाटले तरी म्हणे, असे
गायचे नसते इथे !

ऐकून सारे वैतागली ती
म्हणाली जाते परत
धावत सुटली साऱ्यांना मग
ओव्हरटेक करत !
   
                   
 


Designed By HSMS